सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात रेशन दुकानांमध्ये काळाबाजार केला जातोय का? एखादा दुकानदार रेशनिंगच्या धान्यात भेल मिसळ करतोय का? किवा धान्याची पावती देत नाही? अशा अनेक गोष्टींवर लक्ष ठेवता यावे म्हणून प्रत्येक जिल्ह्यात दक्षता समिती स्थापन केली जाते. सातारा जिल्ह्यात देखील अशा धान्य विरतणावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्ह्यातील तब्बल गावांमध्ये १५२२ दक्षत्यांची निवड झाली आहे. या समितीची निवड प्रक्रिया होऊन बैठकाही होत असल्यामुळे रेशन दुकानदारांवर नियंत्रण राहत आहे. त्यामुळे धान्य मिळत नाही, पावती दिली जात नाही. ई-पॉससमोर रांगा आहेत, अशा अनेक तक्रारी पुरवठा विभागाकडे येण्याचे प्रमाणही घटले आहे.
अनेक गावांमध्ये पूर्वीच्या काळी स्वस्त धान्य दुकानात येणाऱ्या ग्राहकांना वेळेवर धान्य दिले जात नव्हते. धान्य शिल्लक नाही, परत या असे सांगितले जाते. मात्र यामध्ये ग्राहकांचा वेळ जात असे. या तक्रारींना आता कोणत्याही प्रकारचा थारा असणार नाही. प्रत्येक महिन्यातून एकदा समितीची बैठक घ्यावी लागते. नियमित बैठका घेऊन बैठकीचा अहवाल तहसीलदारांना द्यावा लागतो.
ग्रामस्तरवरील १५०९ दक्षता समित्यांच्या जानेवारी ते ऑक्टोबरअखेर ८९२ बैठका घेण्यात आल्या आहेत. नगरपालिका स्तरावरील १३ समित्यांच्या दोन बैठका घेण्यात आल्या आहेत. जिल्हास्तरावर एक समिती, प्रत्येक तालुक्याला एक अशा ११ तालुकास्तरीय समित्या आणि ग्रामस्तरावर आणि नगरपालिका स्तरावरही समित्यांची निवड करण्यात आली आहे.
जिल्ह्यात ३ लाख ८८ हजार ९०७ रेशनकार्डधारक
सातारा जिल्ह्यात ३ लाख ८८ हजार कुटुंबांना शासनाकडून रेशन मिळते. यामध्ये अंत्योदयचे २७ हजार ००७ आणि प्राधान्य गटाचे ३ लाख ६२ हजार ०४२ असे ३ लाख ८८ हजार ९०७ लाभार्थी आहेत. जिल्ह्यातील १ हजार ७१३ रेशन दुकानदारांमार्फत त्यांना धान्य वितरित करण्यात येते.
कोणते किती कार्डधारक?
जिल्ह्यात रेशकार्डद्वारे लाभ घेणाऱ्या रेशनकार्डधारकांचे दोन मुख्य प्रकार आहेत. एक अंत्योदय योजनेतील रेशनकार्डधारक. त्यांची संख्या हि २७ हजार ७ इतकी आहे. तर केशरी रेशकारधारकांची संख्या ३ लाख ६२ हजार ०४२ इतकी आहे.
तहसील पातळीवर दर महिन्याला अहवाल
सातारा जिल्ह्यात काही गावांत समित्या असून त्या त्या गावात गावपातळीवर समित्यांच्या बैठका होतआहेत. त्यांचा तहसील पातळीवर दरमहा अहवाल पाठविला जात आहे. तसेच जिल्ह्याचा अहवालही अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे राज्य सचिव यांना पाठवला जात आहे.
काळा बाजार होऊ नये, म्हणून ‘दक्षता’
धान्याचा काळा बाजार होऊ नये, म्हणून दक्षता समिती स्थापन करण्यात येते. या वर्षभरात निवडणुकीमुळे सातारा जिल्ह्यातील काही गावांतील समित्या स्थापन नाहीत.
समितीचा कार्यकाळ किती वर्षे ?
समितीचा कार्यकाळ तीन वर्षाकरिता असतो. तीन वर्षे झाली की नव्याने ग्रामसभेद्वारे अशासकीय सदस्यांची निवड केली जाते.
दक्षता समिती नेमकं काय काम करते?
गावात असलेली दक्षता समिती हि अनेक महत्वाची कामे करते. शासन दरानुसार धान्य पुरवठा होतो का? हे तपासते. गरजूंना शिधापत्रिका मिळते काय याचा आढावा, तक्रार नोंदवही तपासणे, अशी कामे समिती पार पाडते.
अध्यक्ष कोण होऊ शकतो ?
समिती अध्यक्ष सरपंच, तलाठी सचिव तर सदस्यांमध्ये विविध कार्यकारी सोसायटी अध्यक्ष, तीन महिला, विरोधी पक्षाचे दोन सदस्य, अनुसूचित जाती प्रतिनिधी. अनुसूचित जमाती प्रतिनिधी व एक सामाजिक कार्यकर्ता अशा १३ जणांचा समावेश असतो. दक्षता समिती नसेल तर तहसीलदार, जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे तक्रार करता येते.