उमेदवारांचे लक्ष लाडक्या बहिणींच्या मतांकडे मात्र, विधानसभेला ‘भावा’चीच मते ठरणार निर्णायक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. यंदाच्या निवडणुकीत इच्छुकांसह उमेदवारांचे लक्ष आहे ते लाडक्या बहिणींच्या मतांकडे होय. कारण आतापर्यंतच्या निवणुकीत महिलांच्या मतांपेक्षा जास्त पुरुषांच्या मतांकडे लक्ष दिले जायचे. मात्र आता पुरुषांप्रमाणे महिलांच्या मतांकडे उमेदवारांनी लक्ष केंद्रित केले आहे. यावेळेस महिलांच्या मतांपेक्षा पुरुष मतदारच उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत. कारण जिल्ह्यात २६ लाख २८ हजार मतदारांपैकी तब्बल १३ लाख ३१ हजार पुरुष मतदानाचा हक्क बजावणार आहेत. ‘बहीण’लाडकी झाली असली तरी यंदाच्या निवडणुकीत ‘भावा ‘चीच मते निर्णायक ठरणार आहेत.

विधानसभेचा बिगुल वाजल्यापासून राज्यासह सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुती व महाविकास आघाडीकडून निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांना निवडणूक रिंगणात उतरविले आहे. अगोदर महायुती आणि नंतर महाविकास आघाडीकडून उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली. यामध्ये उमेदवारी न मिळाल्याने बंडखोरांनी देखील आपले अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले आहेत.

यंदाची निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची असल्याने या निवडणुकीत मतदारांचाच कौल निर्णायक ठरणार आहे. सातारा जिल्ह्यातील आठ मतदारसंघांतील मतदारांची संख्या २६ लाख २८ हजार ८७१ इतकी आहे. यामध्ये पुरुष मतदारांची संख्या तब्बल १३ लाख ३१ हजार २५४ इतकी आहे. हीच मते उमेदवारांचे भवितव्य ठरविणार आहेत.

सातारा जिल्ह्यातील मतदार संघ निहाय मतदार संख्या

फलटण विधानसभा : पुरुष – १,७२,४५९, महिला – १.६५,९९१
वाई विधानसभा : पुरुष – १,७३,२२८, महिला – २.७२,७९८
कोरेगाव विधानसभा : पुरुष – १,६१.७२०, महिला – १.५७,०६८
माण विधानसभा : पुरुष – १,८३.१०१, , महिला – १,७४,७३१
कराड उत्तर विधानसभा : पुरुष – १.५४.७४७, महिला – १.५०,०१९
कराड दक्षिण विधानसभा : पुरुष – १,५९.०७७, महिला – १.५४.१७१
पाटण विधानसभा : पुरुष १,५६.१००, महिला – १.५२,२५१
सातारा विधानसभा : पुरुष – १,७०.८२२, महिला – २०१००४
एकूण : पुरुष – १३.३१,२५४, महिला – १२,९७,५०५