सातारा प्रतिनिधी | महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे झालेल्या बारावीच्या परिक्षेचा निकाल मंगळवारी दुपारी ऑनलाईन जाहीर झाला. यामध्ये कोल्हापूर विभागीय मंडळामध्ये सातारा जिल्ह्याचा निकाल ९३.६३ टक्के लागला आहे.
विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक ९९.०२ टक्के लागला आहे. याही वर्षी मुलांपैक्षा मुलीच सरस ठरल्या असून मुलांपैक्षा मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ५.२३ टक्के अधिक आहे.
फेब्रुवारी – मार्च 20२४ मध्ये झालेल्या या परीक्षेस जिल्ह्यात एकूण ३४ हजार ४३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ३३ हजार ७८९ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यामधील ३१ हजार ६३७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, निकालाची टक्केवारी ९३.६३ टक्के आहे. जिल्ह्यात एकूण २५९ कनिष्ठ महाविद्यालये असून ५१ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा पार पडली होती. विज्ञान शाखेचा निकाल ९९.०२ टक्के, कला शाखेचा ७८.५६ टक्के, वाणिज्य शाखेचा ९५.७७ टक्के, व्यवसायिक शिक्षणाचा ९३.४६ टक्के निकाल लागला आहे. आयटीआयचा निकाल ९२.५१ टक्के लागला आहे. बारावी परीक्षेसाठी जिल्ह्यातील पुन: प्रविष्ठ ७६४ विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केली होती. त्यापैकी ३८४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, त्यांची निकालाची टक्केवारी ५०.३२ टक्के आहे.
सातारा जिल्ह्यातील १७ हजार ८७६ मुलांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी १७ हजा ७३० विद्यार्थी परीक्षेस बसले होते. १६ हजार ७५ मुले उत्तीर्ण झाले असून ही टक्केवारी ९०.६६ टक्के आहे. जिल्ह्यातील १६ हजार १६७ मुलींनी या परीक्षेसाठी नोंदणी केली. त्यापैकी १६ हजार ५९ मुलींनी परीक्षा दिली. १५ हजार ५६२ मुली उत्तीर्ण झाल्या असून ही टक्केवारी ९६.९० टक्के आहे. मुलांच्या तुलनेत मुली उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ५.२३ टक्क्यांनी अधिक आहे.