कार्तिकी एकादशी निमित्ताने पंढरपूरला सातारा जिल्ह्यातून जाणार 122 जादा ST गाड्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । दरवर्षी कार्तिकी एकादशीनिमित्त महाराष्ट्रातून लाखो भाविक पंढरपूरला एसटी, रेल्वे तसेच खासगी वाहनांनी जातात. दरवर्षीप्रमाणे यंदाही रेल्वे आणि एसटीकडून भाविकांच्या प्रवाशाच्या सोयीसाठी जादा गाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. कार्तिकी एकादशी उद्या असून या एकादशीला राज्याच्या विविध भागातून भाविक पंढरपूरला जात जाणार आहेत. त्यांची ही कार्तिकी वारी सुरळीत पार पडावी, यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या सातारा विभागाने १२२ जादा गाड्या सोडण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील वारकऱ्यांना विठुरायाचे दर्शन घेणे सोपे जाणार आहे.

यंदा कार्तिकी एकादशी उद्या मंगळवार, दि. १२ रोजी आहे. यानिमित्ताने विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी त्याला डोळे भरुन पाहण्यासाठी सातारा जिल्ह्यातून हजारो वारकरी दरवर्षी पंढरपूरला जात असतात. यंदा जिल्ह्यात पाऊसही चांगला झालेला असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. त्यामुळे दिवाळीही उत्साहात पार पडली. ज्यांना आषाढी वारी घडली नाही ते कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरला जात असतात.

राज्य परिवहन महामंडळाची एसटी हेच एकमेव सोयीचे साधन आहे. दि. ९ ते १७ नोव्हेंबर या कालावधीत जादा फेऱ्या सोडण्याचा संकल्प केला आहे. त्यादृष्टीने विभाग नियंत्रक रोहन पलंगे आणि विभागीय वाहतूक अधिकारी ज्योती गायकवाड यांनी नियोजन केले आहे.

सातारा जिल्ह्यातील एसटी आगारातील नियोजित गाड्या

सातारा आगार : १५ एसटी बस
कराड आगार : १५ एसटी बस
कोरेगाव आगार : १० एसटी बस
फलटण आगार : १५ एसटी बस
वाई आगार : १५ एसटी बस
पाटण आगार : १० एसटी बस
दहिवडी आगार : १० एसटी बस
महाबळेश्वर आगार : ०५ एसटी बस
मेढा आगार : १० एसटी बस
खंडाळा आगार : ०५ एसटी बस
वडूज आगार : १२ एसटी बस