हिंगनोळेत एसटी बसचा अपघात; 12 विद्यार्थी झाले जखमी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | एसटी बसचा स्टेरिंग रॉड तुटल्याने चालकाचा ताबा सुटला. त्यानंतर बस रस्त्यालगत असणाऱ्या नाल्यात आदळून अपघात झाल्याची घटना चोरे ते उंब्रज मार्गावर हिंगनोळे ता. कराड गावच्या हद्दीत बुधवारी घडली. या अपघातात तब्बल १२ विद्यार्थी जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, कराड – चोरजवाडी ही एसटी बस चोरजवाडी, चोरे, वडगाव, इंदोली, भांबेसह या परिसरातील वाड्यावस्तीमधील प्रवाशी व विद्यार्थ्यांसाठी सुरु करण्यात आली आहे. ही बस नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी उंब्रजच्या दिशेने येत होती. या एसटी बसमधून विद्यार्थी- विद्यार्थिनी देखील मोठ्या संख्येने प्रवास करत होत्या.

हिंगनोळे गावच्या हद्दीत एसटी बस आल्यानंतर झरे वस्तीसमोर चोरे ते उंब्रज येणाऱ्या मार्गावर एसटीचा अचानक स्टेरिंग रॉड अचानक तुटला. त्यामुळे बस नाल्यात आदळल्याने विद्यार्थी जखमी झाले.या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन बचाव कार्य केले. या अपघातात सुमारे १२ विद्यार्थी किरकोळ जखमी झाले असून त्यांना तातडीने उंब्रज येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर कराड येथील कृष्णा रुग्णालय काही विद्यार्थ्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.