कराड उत्तरमध्ये एकूण 15 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात; शेवटच्या दिवशी 12 जणांनी घेतली माघार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । राज्य सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या निवडणूक प्रक्रियेत 259 कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातून एकूण 27 उमेदवारांपैकी 12 उमेदवारांनी अंतिम दिवशी आपली नामनिर्देशनपत्रे मागे घेतली. त्यामुळे आता कराड उत्तर विधानसभा निवडणूक रिंगणात एकूण 15 उमेदवार असणार आहेत. तर या ठिकाणी भाजप विरुद्ध शरदचंद्र पवार पक्ष अशी मुख्य लढत पहायला मिळणार आहे.

आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी इब्राहिम मेहमूद पटेल, अपक्ष (रा. वाघेरी, तालुका कराड), राजेंद्र बापूराव निकम, राष्ट्रीय मराठा पार्टी (रा. कोनजावडे, पोस्ट सावरघर, तालुका पाटण), गणेश वसंत घोरपडे, अपक्ष (रा. वाठार किरोली, तालुका कोरेगाव), संतोष पांडुरंग वेताळ, अपक्ष (रा. सुली, तालुका कराड), रवींद्र भिकोबा सूर्यवंशी, अपक्ष (रा. हेळगाव, तालुका कराड), सत्यवान गणपत कमाने, (रा. गोपुज, तालुका खटाव), महादेव दिनकर साळुंखे, अपक्ष (रा. वराडे, तालुका कराड), रवींद्र दत्तात्रय निकम, अपक्ष (रा. खडकपेठ, मसूर, तालुका कराड), दत्तात्रय भीमराव भोसले-पाटील, (रा. खोडशी, तालुका कराड), शिवाजी अधिकराव चव्हाण, अपक्ष (रा. कोपर्डी हवेली, तालुका कराड), प्रशांत रघुनाथ कदम, (रा. वडगाव उंब्रज, तालुका कराड), अधिकराव दिनकर पवार, अपक्ष (रा. गोटे पोस्ट मुंढे, तालुका कराड) यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले असल्याची माहिती 259 कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी विक्रांत चव्हाण, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कल्पना ढवळे, लालासाहेब गावडे व डॉक्टर जस्मिन शेख यांनी दिली आहे.

दरम्यान, यावेळी चिन्ह वाटप देखील करण्यात आले असून यामध्ये बाळासाहेब ऊर्फ शामराव पांडुरंग पाटील, नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी,(चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस), मनोज भिमराव घोरपडे भारतीय जनता पार्टी (चिन्ह कमळ), श्रीपती कोंडीबा कांबळे बहुजन समाज पार्टी (चिन्ह हत्ती), अली महामुद पटेल, वंचित बहुजन आघाडी (चिन्ह गॅस सिलेंडर), सर्जेराव शामराव बनसोडे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) (चिन्ह शिवणयंत्र), सीमा सुनील पोतदार राष्ट्रीय स्वराज्य सेना राहणार पुसेसावळी, तालुका खटाव चिन्ह-बासरी, सोमनाथ रमेश चव्हाण राष्ट्रीय समाज पक्ष, राहणारकालगाव तालुका कराड चिन्ह शिट्टी, अजय महादेव सूर्यवंशी, अपक्ष राहणार हजारमाची, तालुका कराड चिन्ह ट्रम्पेट, दीपक सुनील कदम अपक्ष राहणार वारुंजी तालुका कराड चिन्ह ग्रामोफोन, निवृत्ती केरू शिंदे राहणार शाहूनगर गोडोली, तालुका जिल्हा सातारा, चिन्ह चालण्याची काठी, बाळासो पांडुरंग पाटील अपक्ष राहणार मळगे, पोस्ट मुरगुड तालुका कागल जिल्हा कोल्हापूर चिन्ह एअर कंडिशनर, बाळासो शिवाजी पाटील अपक्ष राहणार चावडीजावळ पोस्ट तुजारपूर, तालुका वाळवा जिल्हा सांगली, चिन्ह कपाट, रामचंद्र मारुती चव्हाण अपक्ष राहणार कामथी, पोस्ट सूर्ती, तालुका कराड, चिन्ह टेबल, वसीम मकबूल इनामदार अपक्ष राहणार रिकिबदारवाडी, पोस्ट तारगाव, तालुका कोरेगाव चिन्ह ऊस शेतकरी, वैभव हनुमंत पवार, अपक्ष राहणार वहागाव, तालुका कराड चिन्ह किटली अशी चिन्हे मिळाली आहेत.