जिल्ह्यात 12,77047 रेशन कार्डधारकांनी केली ‘KYC’ पूर्ण; वर्षभरात आढळले 2079 कर्मचारी

0
464
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सार्वजनिक वितरण विभागाच्या वतीने गोरगरिबांना स्वस्त धान्याचा लाभदिला जातो. मात्र, शासकीय कर्मचारी स्वस्त धान्याचा लाभ घेत असेल आणि ते निदर्शनास आले तर त्यावर कायदेशीर कारवाई केली जात आहे. दरम्यान, सातारा जिल्ह्यात १७ लाख ६१ हजार ५७२ रेशनकार्डधारक असून आतापर्यंत १२ लाख ७७ हजार ०४७ कार्डधारकांनी ‘केवायसी’ पूर्ण केली आहे. उर्वरित कार्डधारकांनी केवायसी पूर्ण करावी, असे आवाहन पुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

सातारा जिल्हा पुरवठा विभागाच्या वतीने दर महिन्याला स्वस्त धान्य लाभार्थ्यांची तपासणी केली जाते. एखाद्या लाभार्थ्यांचे निधन झाले असेल तर त्याचे नाव त्यातून वगळण्यात येते. यासाठी काही ठरावीक कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. आतापर्यंत एकही कर्मचारी स्वस्त धान्याचा लाभ घेत असल्याचे निदर्शनास आलेले नाही.

वर्षभरात आढळले 2079 कर्मचारी

सातारा जिल्हा पुरवठा विभागाच्या वतीने दर महिन्याला लाभार्थ्यांची तपासणी केली जाते. आतापर्यंत २०७९ शासकीय कर्मचारी तरी आढळले आहेत.

तर नियमानुसार त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होणार…

स्वस्त धान्याचा कोणत्याही कर्मचाऱ्याला लाभ घेता येत नाही. हे धान्य केवळ गरिबांसाठी आहे. एवढ्यावरही कोणी स्वस्त धान्य घरात आणत असेल तर नियमानुसार त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते.

रेशनकार्डधारकांचे रेशन बंद होणार

केवायसी नसेल तर रेशन देणे शक्य होणार नाही. नववर्षात ४,८४५२५ जणांचे ‘केवायसी’ अभावी रेशन बंद होऊ शकते. त्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्यांची ‘केवायसी’ लवकरात लवकर करून घ्यावी. काही अडचण असेल तर तसे पुरवठा विभागाला कळवावे, असे आवाहन जिल्हा पुरवठा विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.

‘केवायसी’बाबत सूचना

रेशनकार्डधारकांनी केवायसी पूर्ण करणे गरजेचे आहे. सहाः स्थितीत १२ लाख ७७ हजार ०४७ जणांनी केवायसी पूर्ण केली आहे. शासनाकडून जशा सूचना येतील, त्याप्रमाणे त्याचे पालनही केले जाते. धान्य मिळत नसल्यास त्याबाबत पुरवठा विभागाला कळवावे.