सातारा प्रतिनिधी | महाराष्ट्र सरकारने केंद्र शासनाच्या मान्यतेनुसार शिवकालीन 12 किल्ल्यांचा प्रस्ताव युनेस्कोच्या वारसा स्थळांच्या यादी समावेश होण्यासाठी पाठवलेला आहे. या किल्ल्यांच्या उठावाच्या प्रतिकृती बुधवारी साताऱ्यातील छत्रपती शिवाजी संग्रहालयामध्ये पर्यटकांसाठी दाखल झाल्या संग्रहालयामध्ये विशेष दलनांमध्ये या प्रतिकृती पाहायला मिळणार आहे.
साताऱ्याच्या छत्रपती शिवाजी संग्रहालयामध्ये शिवकाळातील ऐतिहासिक वाघनखे लंडनच्या गिल्बर्ट संग्रहालयातून मधून दाखल झाली आहेत. त्यामुळे शिवाजी संग्रहालयामध्ये सध्या इतिहास प्रेमी नागरिकांची चांगलीच गर्दी होत आहेत. या संग्रहालयाचे वैभव वाढवणाऱ्या आणखी काही शिवकालीन प्रतिकृती या संग्रहालय दाखल झाले आहेत.
भारत सरकारच्या मान्यतेनुसार महाराष्ट्र राज्य शासनाने युनेस्को च्या वारसा स्थळांच्या यादीत महाराष्ट्र व तामिळनाडू राज्यातील 12 शिवकालीन किल्ल्यांचे प्रस्ताव पाठवलेले आहेत. यामध्ये साल्हेर किल्ला, शिवनेरी किल्ला ,लोहगड, खांदेरी किल्ला, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग ,पन्हाळा किल्ला, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग ,आणि तामिळनाडूतून जिंजीचा किल्ला यांचा समावेश आहे.
मुंबई येथील पुरातत्त्व विभागाच्या प्रमुख कार्यालयाकडून ही उठावाच्या प्रतिकृती तयार करण्यात आल्या असून या प्रतिकृती शिवाजी संग्रहालय मध्ये विशेष दालनांमध्ये ठेवल्या जाणार आहेत .आणि लवकरच त्या पर्यटकांसाठी खुल्या केल्या जाणार आहे.