सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात आज हजारी तरुण रोजगाराच्या प्रतीक्षेत आहेत. काही रिजगारानिमित्त पुणे- मुंबईला स्थायी होत आहे. बेरोजगार युवकांसाठी गावामध्येच रोजगार मिळण्याची संधी निर्माण झाली आहे. यासाठी केंद्र शासनाच्या राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स कृती कार्यक्रमांतर्गत ग्रामीण व शहरी भागात नागरिकांपर्यंत शासकीय, निमशासकीय व खासगी सेवा पोहोचविण्यासाठी कॉमन सर्व्हिस सेंटर योजना राज्यात प्रथम २००८ पासून सुरू झाली आहे. या अंतर्गत सातारा जिल्ह्यात तब्बल ११५२ आपले सरकार सेवा केंद्रे वाढवण्यात येणार आहे.
२०१५ पासून कॉमन सर्व्हिस सेंटर आपले सरकार सेवा केंद्रे या कॉमन ब्रेडींग अंतर्गत कार्यरत आहेत. सध्या जिल्ह्यात अनेक गावांमध्ये आपले सरकार सेवा केंद्रांची आवश्यकता आहे. राज्य सरकारनेही केंद्राची संख्या कमी असल्यास केंद्र चालविण्यासाठी ग्रामपंचायत व नगरपंचायतीच्या क्षेत्रासाठी अर्ज मागवण्याच्या सूचना केल्या आहेत. याचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
‘या’ ठिकाणी मिळणार अर्ज
आपले सरकार सेवा केंद्रांसाठी https://www.satara.gov.in या संकेतस्थळावर, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील कुळकायदा शाखेतील सेतू संकलनाकडे दि. ४ ते २० मार्च या कालावधीत अर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कुळकायदा शाखेतच दि. ४ ते २१ या कालावधीत कार्यालयीन वेळेत समक्ष स्वीकारण्यात येणार आहेत.
पात्र अर्जाची यादी ९ एप्रिलला होणार प्रसिद्ध
पात्र आणि अपात्र अर्जाची यादी https://www.satara.gov.in या संकेतस्थळावर तसेच जिल्हाधिकारी कार्यालय व तहसील कार्यालयाचे नोटीस बोर्डवर दि. ९ एप्रिल रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहे. पात्र ठरलेल्यांनी प्रतिज्ञापत्र सादर करायचे आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील कुळकायदा शाखेतील सेतू संकलनाकडे दि. ११ एप्रिल ते ३० एप्रिलदरम्यान समक्ष स्वीकारण्यात येणार आहेत.
सातारा जिल्ह्यातील तालुका आणि आवश्यक केंद्रे
सातारा : 161
जावळी : 107
कोरेगाव : 104
कराड : 148
पाटण : 188
फलटण : 99
माण : 63
खटाव : 92
वाई : 84
महाबळेश्वर : 69
खंडाळा : 37
एकूण : 1152