संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी धावणार 108 बसेस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | श्री. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे आगमन सातारा जिल्ह्यात दि. ६ जुलै रोजी होत आहे. दि. ६ ते ११ जुलैअखेर पालखी सोहळा जिल्ह्यातून मार्गक्रमण करणार असल्यामुळे पालखी सोहळ्यात वारकरी व भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी महामंडळाचा सातारा विभाग सज्ज झाला आहे. सुमारे १०८ जादा बसेस उपलब्ध करण्यात आल्या असून या बसेस विविध मार्गावर धावणार आहेत.

श्री संत ज्ञानेश्वर पालखी सोहळ्याचा लोणंद, तरडगाव, फलटण व बरड येथे मुक्काम होणार आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक पालखीच्या दर्शनासाठी येत असतात. पालखी सोहळ्यात वारकरी व भाविकांची गैरसोय होवू नये यासाठी महामंडळाच्या सातारा विभागातील सर्वच्या सर्व ११ आगार सज्ज झाले आहेत.

कोणत्या आगारातून किती बसेस सुटणार?

पालखी सोहळ्यात सातारा १५, कराड १०, कोरेगाव ८, फलटण २०, वाई ८, पाटण ६, दहिवडी ७, महाबळेश्वर ६, मेढा ८, पारगाव खंडाळा १२, वडूज ८ अशा मिळून १०८ बसेस विविध मार्गावर धावणार आहेत. लोणंद-सातारा -लोणंद मार्गावर ३१ बसेस, उपलब्ध पारगाव खंडाळा-शिरवळ-लोणंद मार्गावर ८ बसेस, लोणंद-पारगाव खंडाळा मार्गावर ९ बसेस, लोणंद-फलटण-पंढरपूर-शिंगणापूर मार्गावर २८ बसेस,शिंगणापूर-लोणंद मार्गावर २७ बसेस, लोणंद-मोर्वे-खंडाळा मार्गावर ३ बसेस, लोणंद-अहिरे-लोणंद मार्गावर २ बसेस धावणार आहेत. तसेच लोणंद, तरडगाव.

पालखी मुक्कामाच्या ठिकाणी वाहतूक नियंत्रकांच्या नियुक्त्या

फलटण, बरड पालखी मुक्कामाच्या ठिकाणी सहाय्यक वाहतूक अधिक्षक,वाहतूक निरीक्षक, वाहतूक नियंत्रकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. पालखी सोहळा कालावधीत जास्तीत जास्त प्रवाशी वाहतूकीचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार अंमलबजावणी करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.