कृष्णामाईची 1008 महिलांकडून सामुदायिक महाआरती; लक्ष लक्ष दिव्यांनी उजळला घाट

0
104
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | तब्बल १००८ महिलांकडून नुकतीच कृष्णामाईची महाआरती करण्यात आली असल्याचा अनोखा उपक्रम भुईंज येथे राबविण्यात आला. महिला दिनाच्या पूर्वसंध्येला दुर्गाष्टमीच्या निमित्ताने भक्तिभावात आणि अलोट गर्दीत दीपोत्सव उत्साहात झाला. भुईंज येथील कृष्णा नदीच्या घाटावर जागतिक महिला दिन व दुर्गाष्टमीच्या निमित्ताने स्वामी विश्व परिवार यांच्या संयोजनातून या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

हरिद्वारचे वेदमूर्ती पंडित व लक्ष लक्ष दिव्यांनी उजळलेला घाट आणि १००८ महिलांनी उत्स्फूर्तपणे केलेली कृष्णामाईची सामुदायिक महाआरतीने परिसर चैतन्य भरले होते. महाआरतीसाठी पुणे येथील सद्‍गुरू मयूर महाराज, खासदार नितीन पाटील, चिले महाराज भक्त परिवार कोल्हापूर, किसन वीर कारखाना उपाध्यक्ष प्रमोद शिंदे यांनीउपस्थिती लावली होती.

तसेच या कार्यक्रमास संचालक मधुकर शिंदे, भय्यासाहेब जाधवराव, विजय वेळे, रामदास जाधव, राहुल तांबोळी, महेंद्र जाधव, विलास साळुंखे, विक्रम केसरकर यांसह विविध मान्यवर देखील उपस्थित होते. यावेळी जयवंत पिसाळ यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर मयूरी पिसाळ यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.