साताऱ्यात 2 ठिकाणी घरफोडी करत चोरटयांकडून 1 लाख 62 हजारांचा ऐवज लंपास

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा शहरातील सध्या चोरी, घरफोडीचे प्रमाण वाढत आहे. नुकतेच सातारा शहरातील दोन ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत 1 लाख 62 हजाराचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी सातारा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा शहरातील फुटका तलाव परिसरात अज्ञात चोरट्यानी घरफोडी केली. घरातून चोरट्यांनी सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याची कानातली फुले, असा एकूण 92 हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरी केला. ही घटना दि. 1 डिसेंबर रोजी घडली असून याप्रकरणी अर्चना शामसिंह राजपूत (रा. सोमवार पेठ, सातारा)यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

तसेच शहरातील शनिवार पेठ या ठिकाणी देखील दि. 27 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी घरातून रोख 50 हजार रुपये, सोन्याचे कानातले, सोन्याचे वेडणे असा एकूण 70 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरुन नेला आहे. या प्रकरणी आकाश चंद्रकांत मोहिते (वय 32. रा. शनिवार पेठ, सातारा) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.