कराड प्रतिनिधी । केंद्र शासनाने नुकताच अक महत्वाचा निर्णय घेतला. बाजार समितीच्या धोरणात बदल करून निवडणूका न घेता कायमस्वरूपी प्रशासकाची नेमणूक करून कारभार चालविण्याचा निर्णय घेतलयांमुळे हा निर्णय तातडीने रद्द करण्याच्या मागणीसाठी आज सातारा जिल्ह्यातील बाजार समित्यांनी बंद पुकारला. त्यामुळे तब्बल एक कोटींची उलाढाल ठप्प झाली.
जिल्ह्यातील एकूण चार मोठ्या अशा असलेल्या सातारा, कराड, वाई आणि फलटण या बाजार समितीत दररोज लाखो रुपयांची शेत मालाच्या माध्यमातून उलाढाल होते. परंतु आज सोमवारच्या एक दिवसाच्या बंदमुळे बाजार समितीतीतील शेतमाल खरेदी विक्री हि बंद राहिली. आडत व्यापाऱ्यांनी बंद मध्ये सहभागी झाल्याने सर्वत्र शुकशुकाट दिसून येत होता. व्यापाऱ्यांचे गाळे बंद होते. फक्त बाजार समिती आवारात कांद्यासारखा शेतमाल ठेवलेला दिसून आला.
बाजार समिती आज बंद ठेवण्यात येणार असल्याचे माहिती असल्याने या बंदमुळे शेतकरीही बाजार समितीकडे फिरकले नाहीत. सातारा बाजार समितीची सुमारे ५० लाख रुपयांची उलाढाल थांबली. तर ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.