सातारा प्रतिनिधी । राज्य शासनाने 18 एप्रिल 2023 पासून रोजी विमा कंपनी विरहीत योजनेची निर्मिती करून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना या नावाने नवीन योजना राज्यामध्ये सुरु केली आहे. या योजनेत अपघाती मृत्यूसाठी 2 लाख रुपये तर अपघाती अपंगत्वासाठी 1 लाख रुपये संरक्षण देण्यात येत आहे. सातारा जिल्ह्यातील दि. 18 एप्रिल ते 31 ऑगस्ट 2023 या कालवधीतील 54 प्रस्ताव शासनाने नुकतेच मंजूर केले असून 1 कोटी 8 लाख रुपये इतकी रक्कम संबंधित दावेदार यांच्या बँक खात्यावर नुकतीच जमा करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी दिली.
शेतकरी मित्रानो, तुम्हालाही सरकारी योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर सेवा केंद्रात जाऊन पैसे खर्च करण्याची कोणतीही आवश्यकता नाही. हॅलो कृषी हे अँप तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करा आणि सरकारी योजनांचा फायदा घ्या. याव्यतिरिक्त Hello Krushi वर तुम्हाला बाजारभाव, हवामान अंदाज, सातबारा उतारा, जमीन मोजणी याबाबतची संपूर्ण माहिती अगदी मोफत मध्ये मिळते. त्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन Hello Krushi डाउनलोड करून मोबाईल मध्ये Install करा. आणि वेगवेगळ्या कृषी योजनांचा आणि सरकारी अनुदानाचा लाभ घ्या.
Hello Krushi डाउनलोड करण्यासाठी Click Here
सातारा तालुका मंजूर दावे – 9, जमा रक्कम – 18 लाख रुपये, कोरेगांव तालुका – मंजूर दावे – 13, जमा रक्कम – 26 लाख रुपये, खटाव तालुका – मंजूर दावे – 4, जमा रक्कम -8 लाख रुपये, कराड तालुका – मंजूर दावे – 4, जमा रक्कम – 8 लाख रुपये, पाटण तालुका – मंजूर दावे – 3, जमा रक्कम – 6 लाख रुपये, वाई तालुका-मंजूर दावे -2, जमा रक्कम – 4 लाख रुपये, जावली तालुका – मंजूर दावे – 5, जमा रक्कम – 10 लाख रुपये, महाबळेश्वर तालुका – मंजूर दावे – 4, जमा रक्कम – 8 लाख रुपये, खंडाळा तालुका – मंजूर दावे – 5, जमा रक्कम – 10 लाख रुपये, फलटण तालुका- मंजूर दावे – 3, जमा रक्कम – 6 लाख रुपये, माण तालुका – मंजूर दावे – 2, जमा रक्कम – 4 लाख रुपये, एकुण 54 दावे व 1 कोटी 08 लाख रुपये जमा रक्कम अशी आहे.
‘या’ शेतकऱ्यांना मिळणार योजनेचा लाभ
यापूर्वी शेतकरी अथवा त्यांच्या वतीने अन्य कोणत्याही संस्थेनं वेगळी विमा योजना केली असल्यास अथवा विमा उतरविला असल्यास त्याचा या योजनेशी काही संबंध राहणार नाही. या योजनेतर्गत मिळणारे लाभ स्वतंत्र असतील. योजना कालावधीत संपूर्ण दिवसासाठी म्हणजेच विहीत कालावधीतील प्रत्येक दिवसाच्या 24 तासासाठी ही योजना लागू राहील. या कालावधीत शेतकऱ्याचा केव्हाही अपघात झाला तरी तो विमा योजनेतर्गत लाभासाठी पात्र राहील. या योजनेंतर्गत ग्राह्य अपघातांचे प्रकार- रस्ता / रेल्वे अपघात, पाण्यामध्ये बुडून मृत्यू, जंतूनाशक अथवा अन्य कारणाने विषबाधा, विजेचा धक्का अपघात, विज पडून मृत्यू, खून, उंचावरून पडून झालेला अपघात वा मृत्यू, सर्पदश/ विंचूदंश, बाळतपणातील मृत्यू, नक्षलवाद्याकडून झालेली हत्या, जनावरांच्या चावण्याने हल्ल्यामुळे जखमी/ मृत्यू. जनावरांच्या चावण्याने रेबीज होऊन मृत्यू, जखमी होऊन मृत्यू, जनावरांच्या हल्ल्यात मृत्यू होऊन शव न मिळणे, दंगल, अन्य कोणतेही अपघात, अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी दिली.
अपघात झालेल्या शेतकऱ्यांचे प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
दि. 18 एप्रिल 2023 अथवा त्यानंतर अपघात झाला असल्यास त्याबाबत मदत मिळवण्यासाठी पात्र शेतकरी / वारसांनी आपले कार्यक्षेत्रातील कृषि पर्यवेक्षक अथवा तालुका कृषि अधिकारी यांचेशी संपर्क साधावा. तसेच त्यांच्यामार्फत प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी श्रीमती फरांदे यांनी केले आहे.