खा. श्रीनिवास पाटील यांच्या पाठपुराव्याने 6 तालुक्यांसाठी 1 कोटी 16 लाख निधी मंजूर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । खासदार शरद पवार गटाचे नेते तथा सातारा लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पाठपुराव्याने सहा तालुक्यांना भरीव अशा स्वरूपाचा निधी मंजूर झाला आहे. प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजने अंतर्गत सातारा, जावली, कोरेगाव, खटाव, कराड व पाटण तालुक्यातील विविध विकासकामांसाठी १ कोटी १६ लक्ष निधीला मंजूरी मिळाली असून त्यामुळे सदर गावातील विकासकामे मार्गी लागून स्थानिक विकासात भर पडणार आहे.
    
खा. श्रीनिवास पाटील यांच्या माध्यमातून सातारा लोकसभा मतदार संघात विविध शासकीय योजनेतून भरीव निधी उपलब्ध होत आहे. त्यामुळे गावोगावच्या विकासाला चालना मिळाल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. त्यांच्या प्रयत्नातून प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजने अंतर्गत १ कोटी १६ लक्ष निधीला मंजूरा मिळाली आहे. त्यामध्ये सातारा तालुक्यातील शिवथर येथे सार्वजनिक स्वच्छतागृह बांधणे १० लक्ष रूपये, जावली तालुक्यातील भिवडी येथे अंतर्गत रस्ता करणे ५ लक्ष, खटाव तालुक्यातील वेटणे येथे जलशुध्दीकरण यंत्रणा बसविणे १० लक्ष.

कोरेगाव तालुक्यातील जायगाव येथे अंतर्गत रस्त्ता करणे ५ लक्ष, भाटमवाडी येथे अंतर्गत रस्ता करणे ५ लक्ष, वडाचीवाडी येथे अंतर्गत रस्ता करणे ५ लक्ष, नलवडेवाडी येथे अंतर्गत रस्ता करणे ५ लक्ष. कराड तालुक्यातील कालगाव येथे प्राथमिक शाळेस क्रीडा साहित्य देणे ५ लक्ष, नांदलापूर येथे शाळेची इमारत खोली बांधणे १० लक्ष, पाडळी केसे येथे अंतर्गत रस्ता करणे ८ लक्ष, शिंदेवाडी (कोळेवाडी) येथे अंतर्गत रस्ते कॉंक्रिटीकरण करणे १० लक्ष.
       
पाटण तालुक्यातील डिगेवाडी येथे व्यायामशाळा करणे १० लक्ष, पापर्डे येथे सांडपाणी व्यवसथापनासाठी गटर्स व कॉंक्रिटीकरण रस्ते बांधणे १० लक्ष रुपये, चेवलेवाडी येथे अंतर्गत रस्ते करणे १० लक्ष, नेरळे येथे अंतर्गत रस्ते करणे १० लक्ष रुपये असा निधी मंजूर झाला आहे. हा निधी मंजूर झाल्याने स्थानिक विकासकामे मार्गी लागणार आहेत.