’सह्याद्री’साठी अर्ज भरण्यास प्रारंभ; पहिल्या दिवशी ‘या’ उमेदवाराने केला अर्ज दाखल

0
1683
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सह्याद्री साखर कारखान्याची निवडणूक बुधवारी जाहीर झाली. आता गुरुवार, दि. २७ फेब्रुवारीपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ती दि. ५ मार्चपर्यंत सुरू राहणार आहे.

सह्याद्री कारखान्याच्या निवडणुकीच्या अनुषंगाने कराड पालिकेच्या छत्रपती भाजी निवडणूक संभाजीराजे मार्केटमध्ये निर्णय अधिकाऱ्यांचे कार्यालय सुरू करण्यात आले असून, राजकीय घडामोडी गतिमान झाल्या आहेत.

सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या २१ संचालक पदांसाठी रणधुमाळी आता सुरू झाली आहे. या निवडणुकीत पहिल्या दिवशी एक उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे. अर्ज दाखल करण्याची मुदत ही ५ मार्च पर्यंत ठेवण्यात आलेली आहे.

पहिला अर्ज दाखल..

सह्याद्री साखर कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलमधून पहिल्याच दिवशी मसूर गटातून विद्यमान संचालक संतोष शिवाजीराव घार्गे यांनी आपला पहिला अर्ज दाखल केला.

असे असणार उमेदवार

उत्पादक सभासद मतदारसंघातून १६ संचालक निवडले जाणार ते गटनिहाय पुढीलप्रमाणे : कराड गट- २, तळबीड गट- २, उंब्रज गट – ३, कोपर्डे हवेली गट-३, वाठार किरोली गट- ३, मसूर गट- ३, अनुसूचित जाती जमाती गट- १, महिला राखीव गट- २, इतर मागास प्रवर्ग – १, भटक्या विमुक्त जाती जमाती विशेष मागास प्रवर्ग – १, एकूण संचालक – २१

असा आहे निवडणूक कार्यक्रम

अर्ज दाखल प्रक्रिया – २७ फेब्रुवारी ते ५ मार्च

अर्जाची छाननी – ६ मार्च

वैद्य उमेदवारांची यादी प्रसिद्धी – ७ मार्च

अर्ज मागे घेण्याचा कालावधी – ७ ते २१ मार्च

उमेदवारांना चिन्ह वाटप – २४ मार्च

मतदान – ५ एप्रिल (सकाळी ८ ते सायंकाळी ५)

मतमोजणी व निकाल – ६ एप्रिल