हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कराड तालुक्यातील महत्वाची असलेली कोयना सहकारी वाहतूक कामगार संस्थेची पंचवार्षिक निवडणुक नुकतीच बिनविरोध पार पडली. माजी सहकार मंत्री विलासराव पाटील उंडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही संस्था स्थापन करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस जि. प. सदस्य अॅड उदयसिंह पाटील उंडाळकर संस्थेचे संस्थापक आहेत.
या संस्थेची 2022 – 23 ते 2026- 27 या नवीन वर्षासाठीची चेअरमन व संचालक मंडळाची निवड करण्यात आली. निवड झालेल्या संचालक मंडळात विद्यमान चेअरमन तुकाराम राजाराम पाटील (साळशिरंबे) यांचा समावेश असून विजयसिंह मानसिंगराव थोरात (ओंड) सचिन कुमार आत्माराम पाटील (म्हासोली) धनाजी सदाशिव पाटील (उंडाळे) जगदीश बाळासाहेब निकम (शेरे),महादेव आनंदा शिंदे (शिंदेवाडी) कोळेवाडी, विशाल दिनकर पाटील (तुळसण) संपतराव दिनकरराव खबाले (विंग) सुशीला गुलाब सुतार (कराड) भागवत खाशाबा गओतपआगर (कोडोली) काशिनाथ विठ्ठल कारंडे (टाळगाव) जावेद मन्सूर फकीर (कोळे) यांचा नव्या संचालक मंडळात समावेश करण्यात आला आहे.
यावेळी रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अॅड उदयसिंह पाटील यांनी स्वागत केले. तसेच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, कोयना बँकेचे अध्यक्ष रोहित पाटील, कोयना दूध संघाचे चेअरमन वसंतराव जगदाळे, कराड तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन अनिल मोहिते, कराड शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजय कदम यांनी नुकतेच बिनविरोध निवडी झालेल्या नूतन संचालक मंडळाचे अभिनंदन केले.